Thursday, May 30, 2024

मोही प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सात वर्षापासून धुळखात

माण तालुक्यातील मोही गावात शासनाकडून लाखो रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारले आहे, पण गेल्या सात वर्षापासून काम पूर्ण होऊनही कुलूप बंद आहे. 
वारंवार संबंधित विभागाकडे हे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी व पैलवान  किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन(रजि) यांनी मागणी करूनही आजपर्यंत प्राथमिक उपकेंद्र सुरू झाले नाही त्याबद्दल ग्रामस्थ नाराज.

सविस्तर बातमी लोकमत नेटवर्क-
प्रतिनिधी- शरद देवकुळे

पूर्ण काम होऊनही अनेक वर्षापासून हे उपकेंद्र धुळखात पडून आहे. उपकेंद्र सुरू करून मोही ग्रामस्थांची आरोग्य विषयीची गैरसोय दूर करावी.
- दत्तात्रय भगत (भारतीय सेना)

मोही गावची कन्या महाराष्ट्रात तिसरा क्रमांक

आपल्या गावची कन्या  कु.प्रांजल जितेंद्र चव्हाण मंथन जनरल नॉलेज एक्झामेंशन  २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्ट्रात  ३ आली.... १५० पैकी १४...