Saturday, February 17, 2024

किल्ले स्वच्छता अभियान पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन, मोही| किल्ले शिखर शिंगणापूर

मोहीकरांचा व पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) मोही शिवजन्मोत्सव निमित्त एक अनोखा उपक्रम खूप आनंदात व उत्साहात पार पडला.
त्यावेळेस मोही गावातील सर्व शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग खूप मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
शाळेतील मुलांना स्वच्छतेचे आवड लागावी व गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी छोटासा उपक्रम
मोही गावातील तरुण वर्ग पैलवान मंडळी सर्वजण या उपक्रमांमध्ये सामील झाले होते.उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना पैलवान किरण भगत फाउंडेशन मार्फत टी-शर्ट देण्यात आले.या उपक्रमामध्ये मोहीतील सर्व तरुण वर्ग ही उपस्थित होता.कन्या विद्यालय, मोही ,श्री महालक्ष्मी विद्यालय ,मोही
जिल्हा परिषद शाळा ,मोही  यांचे खूप मोलाचे सहकार्य झाले.
त्यावेळेस जेष्ठ पत्रकार तंडे काका सर्वांना फराळ व फळे वाटप त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद......
यापुढेही फाउंडेशन मार्फत खूप चांगले उपक्रम घेण्यात येतील आपल्या सर्वांचे सहकारी आशेच राहू द्या
 
       टीम पैलवान किरण भगत स्पोर्ट्स फाउंडेशन

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...