Saturday, June 21, 2025

योगक्षेत्रात वाढवला जिल्ह्याचा नावलौकिकबाल योगी वरदला योगसाधनेचे वरदान ! पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

तन, मन, आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग तुमच्या आयुष्यात समतोल घेऊ येवो! योग दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

*शरीर थकलं तर त्याला व्यायामाची गरज आहे व मन थकलं तर त्याला योगाची गरज आहे.*

*आपल्या शरीराला व मनाला अंतर बाह्य निर्मळ करण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे योग आहे.*
भारत देशाने संपूर्ण जगाला दिलेले प्रभावी माध्यम म्हणजे योग आहे.
आज दिनांक 21 जून योगा दिवस या दिवशी *पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)* 
आयोजित 
योग साधना शिबिर वर्ष दुसरे 
मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळेस उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भाऊ भगत यांच्या उपस्थितीत पार पडले. 

 आपल्या मोही गावातील कन्या विद्यालय, श्री महालक्ष्मी विद्यालय व जुनिअर कॉलेज व जिल्हा परिषद शाळा व प्राध्यापक व शिक्षक वर्ग सर्व कर्मचारी त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मोही तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत व महिला वर्ग फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळेस शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योगा दिवसानिमित्त टी-शर्ट वाटप करण्यात आले. 
    उपस्थित प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांस फाउंडेशन मार्फत खाऊ वाटप करण्यात आला.
तसेच प्रमुख उपस्थिती पाहुणे व योग गुरु, शाळेचे प्राचार्य यांना शाल श्रीफळ वा फाउंडेशन मार्फत सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 
व्यायामाचे व योगासनाचे आवड निर्माण व्हावी याही तुम्ही जागतिक योगा दिवस यानिमित्त हा फाउंडेशन मार्फत छोटासा प्रयत्न आज करण्यात आला होता.
      सरासरी मोही गावातील४०० ४५० जण सहभागी झाले होते. 

त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.....
याही पुढे खूप चांगले उपक्रम 
पैलवान किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि) सार्वजनिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यक्रम यांच्यामार्फत घेण्यात येते.

जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 

शुभेच्छुक-  
पै किरण भगत स्पोर्टस फाउंडेशन (रजि)

No comments:

Post a Comment

वस्ताद दादा पाटोळे उपाध्यक्षपदी निवड.....

वास्ताद दादा पाटोळे – समर्पण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श गावाच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण शिक्षणव्यवस्थेच्या उन्नतीसाठी...